यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

आमच्याविषयी

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।
महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी सिंचन, पाणीपुरवठा व जलविद्युत प्रकल्पाच्या कामात यांत्रिकी संघटनेने मागील ५४ वर्षात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.

यांत्रिकी संघटना ही महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागांतर्गत यांत्रिकी कामासाठीची शाखा आहे. या संघटनेची सन १९५९ मध्ये स्थापना झालेली असून करण्यात येणा-या कामांचे खालील कार्यप्रकार आहेत.


 • मातीकामाच्या संयंत्रांचे नियोजन (वापर, देखभाल व दुरूस्ती)
 • जलद्वारे व उच्चालकांचे नियोजन (निर्मिती, उभारणी व दुरूस्ती)
 • उपसा सिंचन योजनांचे संकल्पन, नियोजन, पंपांची उभारणी व कार्यान्वितीकरण
 • यांत्रिकी कर्मशाळांचे नियोजन
 • विंधन कामे
 • आपत्कालीन सेवा
यांत्रिकी संघटनेचे पाटबंधा-यांचे बांधकाम, सिंचन व जलविद्युत प्रकल्पांची कामे यासाठी मोठे योगदान आहे.


 • संघटनेअंतर्गत खालीलप्रमाणे कार्यालये आहेत.
 • मुख्य अभियंता (यांत्रिकी) कार्यालय -- १
 • यांत्रिकी मंडळ कार्यालये -- ५
 • विभागीय कार्यालये -- ३०
 • उपविभागीय कार्यालये -- १२५

उपलब्ध संयंत्रांची भांडवली किंमत सुमारे रू.१४३ कोटी आहे.

 • यांत्रिकी संघटनेने साध्य केलेली एकूण कामे खालीलप्रमाणे :
 • प्रकल्प मातीकाम व कालवा स्वच्छता कामे – ४,२७,६५३ स.घ.मी.
 • व्दारांची निर्मिती कामे – १,६०,५१४ मे. टन.
 • व्दारांची उभारणी कामे – १,३७,१५० मे. टन
Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.