यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कार्यप्रकार

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

प्रकल्प मातीकामे

उपलब्ध पाण्याचा साठा करणे व आवश्यक कामांसाठी योग्य वाटप करणे हे राज्याच्या व देशाच्या विकासासाठीचे महत्वाचे काम आहे. प्रकल्पांच्या व कालव्यांच्या मातीकामासाठी विशिष्ट अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. यांत्रिकी संघटनेकडे मोठ्या संख्येने मातीकामाची संयंत्रे जसे- क्राऊलर टॅक्टर, डोझर्स, स्क्रेपर्स, लोडर्स, एक्स्कॅव्हेटर्स, डंपर्स, टिप्पर्स, ट्रक, रोलर, कॉम्पॅक्टर, क्रेन इ. उपलब्ध आहेत. त्यांची मातीकामाची उत्पादक क्षमता सुमारे 14510 स.घ.मी. प्रति वर्ष आहे.

लोडर्स : टायर्स असलेली, ट्रॅक चेन असलेली या २ प्रकारचे लोडर्स, डंपर / टिप्परमध्ये माल भरण्यासाठी वापरण्यात येतात.

एक्स्कॅव्हेटर्स : माती, गाळ, झुडपे काढणे व टिप्पर मध्ये भरणे यासाठी वापरण्यात येतात.

डोझर्स : खाणीमध्ये माल गोळा करण्यासाठी, कार्यक्षेत्रावर माल पसरविणे व सारखा करणे यासाठी वापरण्यात येतात.

स्क्रेपर्स : माल उचलणे, वाहून नेणे, ओतणे, पसरविणे ही कामे करतात.

पुढे वाचा


कालव्यांची देखभाल


पाणी हे अमूल्य राष्ट्रीय संपत्ती असल्याने उपलब्ध पाण्याचा सुयोग्य व प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. प्रति दिवस पाण्याची मागणी घरगुती, औद्योगिक व सिंचन कामासाठी वाढतच आहे. यासाठी पाण्याची साठवण क्षमता वाढविणे आणि पाण्याची गळती थांबविणे आवश्यक ठरते. राज्यातील सर्व कालवे चांगल्या वहन स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संयंत्रांद्वारे कालव्यातील गाळ व झुडपे काढण्यात येतात व भरावांची दुरूस्ती करण्यात येते.


जलसंपदा विभागात ही कामे सन 2002-03 पासून यांत्रिकी संघटनेमार्फत करण्यात येत आहेत . याबाबतच्या उत्कृष्ट कामाबद्दल यांत्रिकी संघटनेस सन 2003 मध्ये मा . मुख्यमंत्र्यांचा रू . 50000 / - चा सांघिक पुरस्कार प्राप्त झालेला आहे . सन 2..2 - .3 पासून कालवा स्वच्छता व भरावाची एकूण 1,10,107 स.घ.मी. कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत .

पुढे वाचा


जलद्वारे व उच्चालक निर्मिती , उभारणी व दुरुस्ती


जलद्वारांच्या माध्यमाने धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियंत्रण करण्यात येते . द्वारांचे मुख्य भाग पुढीलप्रमाणे 1.निर्विष्ठ भाग 2.द्वार कळी 3.उच्चालक व्यवस्था द्वार कळी व निर्विष्ठ भाग यांचे संकल्पन मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना , नाशिक यांचे मार्फत करण्यात येते . जलद्वारांचे कार्य व स्थान यानुसार त्याचे विविध प्रकार पडतात .

जलद्वारे: वक्रद्वारे, झडपद्वारे, बॅरेजची उभी उचलद्वारे, थोपद्वारे, कालवा द्वारे, विद्युत विमोचक द्वारे इ.

उच्चालक : वायर रोप उच्चालक (विद्युत), विद्युत चलित यारी, स्क्रू स्टेम उच्चालक, द्रवचलित उच्चालक, गोलिएथ क्रेन, चेन पुली ब्लॉक इ.

इतर : कचरा प्रतिबंधक संरचना, ट्रान्झिशन व्यवस्था, पातनळ, वाय पीस बल्क हेड, लिफ्टींग बीम, वातनलिका, बायपास इ.

निर्मिती यंत्रणा : यांत्रिकी संघटनेमार्फत द्वारांचे व घटक भागांचे निर्मिती काम प्रामुख्याने दापोडी, पुणे येथील कर्मशाळेत करण्यात येते. याशिवाय खालील ठिकाणी कर्मशाळा आहेत.

यांत्रिकी संघटनेद्वारे सन 1 9 60 पासून आतापर्यंत जवळजवळ 160 9 74 मे.टन इतकी द्वार निर्मिती कामे करण्यात आलेली आहेत . सन 2006-07 मध्ये 5101 मे.टन एवढी विक्रमी द्वार निर्मितीची कामे करण्यात आली . या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यांत्रिकी संघटनेस महाराष्ट्र शासनाकडून सन 2007 मध्ये रू . 50000 / - चा सांघिक पुरस्कार प्राप्त झालेला आहे .

पुढे वाचा


विंधन कामे


धरणांच्या / प्रकल्पांच्या कार्यस्थळाचे तपासणीअंतर्गत मुख्य धरण, पावर हाऊस यांचा पाया ठरविण्यासाठी विंधनाद्वारे सॅंपल कोअर काढणेची कामे विविध यंत्रांद्वारे करण्यात येतात. या कामासाठी दापोडी, पुणे येथे एक उप विभाग कार्यरत असून त्यांचेमार्फत राज्याच्या सर्व भागातील प्रकल्पांची कामे करण्यात येतात. त्यांचेकडे विविध प्रकारची विंधन यंत्रे जसे जॉय 7, जॉय 12 बी, लॉग ईअर, एकर डायमंड इ. यंत्रे आहेत.


कार्यस्थळावरुन विंधनाद्वारे काढलेले कोअर आवश्यक तपासणी व अभ्यासासाठी प्रकल्प अधिका-यांकडे देण्यात येतात.

पुढे वाचा


उपसा सिंचन योजना


उपसा सिंचन योजनेमध्ये खालच्या पातळीवरील पाणी पंपांच्या सहाय्याने वरच्या पातळीवर उचलले जाते. धरण व कालव्यांची निर्मिती यांमुळे धरण पातळीपेक्षा खालची पातळी असलेले मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र ओलीताखाली आणणे शक्य झाले आहे. परंतु वरच्या पातळीवरील क्षेत्र ओलीताखाली आणणे पाण्याच्या कमतरतेमुळे शक्य झालेले नाही, म्हणून वरच्या पातळीवरील क्षेत्र ओलीताखाली आणणेकरिता उपसा सिंचन योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत.


उपसा सिंचन योजनेचे फायदेः

1. उपसा सिंचन योजनेमुळे वरच्या पातळीवरील क्षेत्र ओलीताखाली आणणे शक्य झाले आहे .

2. उपसा सिंचन योजनेकरिता भूसंपादनाबाबतच्या समस्यांचे प्रमाण कमी आहे .

3. पाण्याचा अपव्यय कमीत कमी होतॊ .

उपसा सिंचन योजनेच्या गरजाः

पाण्याचा स्त्रोत : उपसा सिंचन योजना असलेल्या ठिकाणी पाण्याचा योग्य व सतत असा स्त्रोत वर्षभर उपलब्ध असणे आवश्यक आहे. धरणातील, K.T. weir मधील, कालव्यातील पाणी उपसा सिंचन योजनेकरिता उपलब्ध केले जाऊ शकते.

उचल माध्यम : आवश्यक असलेल्या ठिकाणी पाण्याचा उपसा करणेसाठी उचल माध्यम म्हणजेच पंपांची आवश्यकता असते. पाण्याचा विसर्ग व duty point head यावर पंपांची निवड केली जाते.

वहन माध्यम : उर्ध्वनलिका ही स्टील, काँक्रीट किंवा इतर योग्य पदार्थांची बनलेली असते.

पुढे वाचा


आपत्कालीन कामे


यांत्रिकी संघटनेने नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये जसे अतीवृष्टी, पूर, भूकंप, दरड कोसळणे यावेळी सयंत्रांद्वारे मदतकार्य व पुनर्वसन, दुष्काळात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे अशी महत्वाची कामे केलेली आहेत.


पुढे वाचा


वाहतूक कामे


कर्मशाळेपासून प्रकल्प स्थळावर अवजड संयंत्रांची , द्वारांच्या घटक भागांची , पेन स्टॉक , वाय पाइप इ . अवजड भागांची वेळेत व सुखरूप वाहतूक करणे हे एक जोखमीचे व महत्वाचे काम आहे . यासाठी यांत्रिकी संघटनेकडे 7.5 मे.टन पासून 60 मे.टन क्षमतेची विविध वाहने आहेत . डोझर्स , स्क्रेपर्स , लोडर्स , एक्सकॅव्हेटर्स यांची एका प्रकल्पावरून अन्य प्रकल्पावर सुद्धा वाहतुक करावी लागते .

पुढे वाचा


संयंत्रे निर्लेखन


यांत्रिकी संघटनेकडे मोठयाप्रमाणात अवजड यंत्र सामग्री, कर्मशाळेतील संयंत्रे, तसेच निरिक्षण वाहने आहेत. मध्यवर्ती जलआयोगाचे मार्गदर्शक पुस्तिकेत नमुद केलेले विहीत आयुष्यमान पूर्ण केल्यानंतर सयंत्रे निर्लेखनास पात्र ठरतात. तसेच अपघात किंवा कालबाहय झाल्यामुळे सुटेभागाचे उपलब्धतेअभावी सुध्दा संयंत्रे / वाहने निर्लेखित करावी लागतात. कर्मशाळेत होणा-या उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पोलाद, पितळ व इतर स्क्रॅप तयार होते. या सयंत्रांचा व अन्य साहित्याचा निर्लेखन प्रस्ताव सक्षम अधिकारी मंजूर करतात.


अधीक्षक अभियंता मंडळांतर्गत एक समिती स्थापन करुन निर्लेखन मंजूर झालेल्या सयंत्रे, अवजारे, वाहने व भंगार / स्क्रॅप यांची हातची किंमत निश्चित करतात. त्यानंतर सदर बाबींची शासनाने नेमलेल्या लिलावदारामार्फत व्यापक प्रसिध्दीद्वारे, जाहीर लिलावाद्वारे स्पर्धात्मक पद्धतीने विक्री करण्यात येते. जाहीर लिलावाचे कार्यवाहीसाठी जलसंपदा विभागात जाहीर निविदा प्रक्रियेअंती शासनाची मंजूरी प्राप्त करुन मुख्य अभियंता (यां.) यांचेमार्फत अधिकृत शासकीय लिलावदाराची प्रती द्वैवार्षिक नेमणूक करण्यात येत असते. सदर अभिकरणामार्फत लिलावाची कार्यवाही वेळोवेळी आवश्यकतेमुसार करण्यात येत असते. लिलावातील जास्तीत- जास्त आलेली बोली हातच्या किंमती पेक्षा अधीक असल्यास स्वीकृत करण्याचे अधिकार संबंधीत अधीक्षक अभियंतांनी लिलावाचे कार्यवाहीसाठी निश्चित केलेल्या समितीस असतात. लिलावातील नियम व अटी-शर्तींनुसार स्विकृत बोलीची पूर्ण रक्कम लागू असलेल्या करांसह बोलीदाराने भरल्यानंतर साहित्य बोलीदाराचे ताब्यात देण्यात येते. लिलावात प्राप्त झालेली रक्कम (कर वगळून) शासनाचे महसूल खाती जमा करण्यात येते.

पुढे वाचा


कर्मशाळा नियोजन


यांत्रिकी संघटनेअंतर्गत कर्मशाळांमध्ये संयंत्रांच्या देखभाल दुरूस्तीची कामे आणि जलद्वारांच्या घटकभागांच्या निर्मितीची कामे करण्यात येतात. यासाठी सर्व यांत्रिकी मंडळांतर्गत कर्मशाळा कार्यरत आहेत. दापोडी, पुणे येथे मोठी कर्मशाळा असून तेथे जलद्वारांची निर्मिती, उच्चालक, पेनस्टॉक, वाय पाईप इ. निर्मिती करण्यात येते. तसेच तेथे ओतीव भागांचे कामही करण्यात येते. यांत्रिकी मंडळांतर्गत खालील ठिकाणी कर्मशाळा आहेत.

पुढे वाचा


Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.