यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कार्यप्रकार

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कालव्यांची देखभाल


पाणी हे अमूल्य राष्ट्रीय संपत्ती असल्याने उपलब्ध पाण्याचा सुयोग्य व प्रभावी वापर होणे आवश्यक आहे. प्रति दिवस पाण्याची मागणी घरगुती, औद्योगिक व सिंचन कामासाठी वाढतच आहे. यासाठी पाण्याची साठवण क्षमता वाढविणे आणि पाण्याची गळती थांबविणे आवश्यक ठरते. राज्यातील सर्व कालवे चांगल्या वहन स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. यासाठी संयंत्रांद्वारे कालव्यातील गाळ व झुडपे काढण्यात येतात व भरावांची दुरूस्ती करण्यात येते.


जलसंपदा विभागात ही कामे सन 2002-03 पासून यांत्रिकी संघटनेमार्फत करण्यात येत आहेत . याबाबतच्या उत्कृष्ट कामाबद्दल यांत्रिकी संघटनेस सन 2003 मध्ये मा . मुख्यमंत्र्यांचा रू . 50000 / - चा सांघिक पुरस्कार प्राप्त झालेला आहे . सन 2002-2003 पासून कालवा स्वच्छता व भरावाची एकूण 1,10,107 स.घ.मी. कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत .Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.