यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कार्यप्रकार

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

संयंत्रे निर्लेखन


यांत्रिकी संघटनेकडे मोठयाप्रमाणात अवजड यंत्र सामग्री, कर्मशाळेतील संयंत्रे, तसेच निरिक्षण वाहने आहेत. मध्यवर्ती जलआयोगाचे मार्गदर्शक पुस्तिकेत नमुद केलेले विहीत आयुष्यमान पूर्ण केल्यानंतर सयंत्रे निर्लेखनास पात्र ठरतात. तसेच अपघात किंवा कालबाहय झाल्यामुळे सुटेभागाचे उपलब्धतेअभावी सुध्दा संयंत्रे / वाहने निर्लेखित करावी लागतात. कर्मशाळेत होणा-या उत्पादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पोलाद, पितळ व इतर स्क्रॅप तयार होते. या सयंत्रांचा व अन्य साहित्याचा निर्लेखन प्रस्ताव सक्षम अधिकारी मंजूर करतात.


अधीक्षक अभियंता मंडळांतर्गत एक समिती स्थापन करुन निर्लेखन मंजूर झालेल्या सयंत्रे, अवजारे, वाहने व भंगार / स्क्रॅप यांची हातची किंमत निश्चित करतात. त्यानंतर सदर बाबींची शासनाने नेमलेल्या लिलावदारामार्फत व्यापक प्रसिध्दीद्वारे, जाहीर लिलावाद्वारे स्पर्धात्मक पद्धतीने विक्री करण्यात येते. जाहीर लिलावाचे कार्यवाहीसाठी जलसंपदा विभागात जाहीर निविदा प्रक्रियेअंती शासनाची मंजूरी प्राप्त करुन मुख्य अभियंता (यां.) यांचेमार्फत अधिकृत शासकीय लिलावदाराची प्रती द्वैवार्षिक नेमणूक करण्यात येत असते. सदर अभिकरणामार्फत लिलावाची कार्यवाही वेळोवेळी आवश्यकतेमुसार करण्यात येत असते. लिलावातील जास्तीत- जास्त आलेली बोली हातच्या किंमती पेक्षा अधीक असल्यास स्वीकृत करण्याचे अधिकार संबंधीत अधीक्षक अभियंतांनी लिलावाचे कार्यवाहीसाठी निश्चित केलेल्या समितीस असतात. लिलावातील नियम व अटी-शर्तींनुसार स्विकृत बोलीची पूर्ण रक्कम लागू असलेल्या करांसह बोलीदाराने भरल्यानंतर साहित्य बोलीदाराचे ताब्यात देण्यात येते. लिलावात प्राप्त झालेली रक्कम (कर वगळून) शासनाचे महसूल खाती जमा करण्यात येते.Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.