यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कार्यप्रकार

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

प्रकल्प मातीकामे


उपलब्ध पाण्याचा साठा करणे व आवश्यक कामांसाठी योग्य वाटप करणे हे राज्याच्या व देशाच्या विकासासाठीचे महत्वाचे काम आहे. प्रकल्पांच्या व कालव्यांच्या मातीकामासाठी विशिष्ट अवजड यंत्रसामग्रीची आवश्यकता असते. यांत्रिकी संघटनेकडे मोठ्या संख्येने मातीकामाची संयंत्रे जसे- क्राऊलर टॅक्टर, डोझर्स, स्क्रेपर्स, लोडर्स, एक्स्कॅव्हेटर्स, डंपर्स, टिप्पर्स, ट्रक, रोलर, कॉम्पॅक्टर, क्रेन इ. उपलब्ध आहेत. त्यांची मातीकामाची उत्पादक क्षमता सुमारे 14510 स.घ.मी. प्रति वर्ष आहे.

लोडर्स : टायर्स असलेली, ट्रॅक चेन असलेली या २ प्रकारचे लोडर्स, डंपर / टिप्परमध्ये माल भरण्यासाठी वापरण्यात येतात.

एक्स्कॅव्हेटर्स : माती, गाळ, झुडपे काढणे व टिप्पर मध्ये भरणे यासाठी वापरण्यात येतात.

डोझर्स : खाणीमध्ये माल गोळा करण्यासाठी, कार्यक्षेत्रावर माल पसरविणे व सारखा करणे यासाठी वापरण्यात येतात.

स्क्रेपर्स : माल उचलणे, वाहून नेणे, ओतणे, पसरविणे ही कामे करतात.

वाहतूक यंत्रे: मालाचे वाहतुकीसाठी डंपर्स, टिप्पर्स व ट्रक वापरण्यात येतात.

दबावाची यंत्रे : प्रकल्प मातीकाम, कालव्याचा भराव दाबण्यासाठी व याद्वारे मातीची घनता वाढवून आवश्यक ताकद येण्यासाठी कॉम्पॅक्टर मशीन वापरण्यात येतात. सद्यस्थितीत या संघटनेकडील उपलब्ध संयंत्रांची उत्पादन क्षमता प्रति वर्षी १४५१० स.घ.मी. इतकी आहे. प्रत्येक वर्षी यांत्रिकी संघटनेने करावयाचे प्रकल्प मातीकाम व कालवा स्वच्छता काम हे मा. सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुख्य अभियंतांबरोबरच्या वार्षिक पाखरण बैठकीत ठरविण्यात येते. उपलब्ध संयंत्रांची उत्पादन क्षमता व प्रकल्प कामांचे प्राधान्य यानुसार संयंत्रांचे नियोजन करण्यात येतेCopyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.