यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

खरेदी सल्लागार समिती

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

जलसंपदा विभागांतर्गत प्रकल्प कामांसाठी आवश्यक यांत्रिकी संयंत्रे, उपकरणे व भांडारातील वस्तूंच्या खरेदीकरिता शासन निर्णय क्र. एमसीएन-जलसंपदा ११८४/(६७/८४) / पीआरजे.आय, मंत्रालय, मुंबई ४०००३२ दि. १० मार्च १९८४ नुसार खालील खरेदी सल्लागार समिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत.


 • खरेदी सल्लागार समिती ( अ)
 • खरेदी सल्लागार समिती ( क)
 • खरेदी सल्लागार समिती ( ई)

खरेदी सल्लागार समिती (क) व खरेदी सल्लागार समिती (इ) यांच्या सदस्य सचिवांचे कार्यालय यांत्रिकी भवन, दापोडी, पुणे येथे आहे. खरेदी सल्लागार समिती (अ) चे मुख्यालय मंत्रालय, मुंबई येथे आहे.

खरेदी सल्लागार समिती ( अ)

खरेदी सल्लागार समिती सदस्य
मुख्य अभियंता (प्रकल्प) व सहसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय अध्यक्ष
मुख्य अभियंता ( यांत्रिकी) , जलसंपदा विभाग. सदस्य
अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, पुणे सदस्य
अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, पुणे सदस्य
अंतर्गत वित्तीय अधिकारी व उपसचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय सदस्य
अधीक्षक अभियंता व उपसचिव (I.P.), जलसंपदा विभाग, मंत्रालय सदस्य सचिव
 • खरेदी सल्लागार समिती (अ) ने खरेदी करावयाच्या वस्तू / भाग :
 • सर्व प्रकारची अवजड यंत्रसामुग्री (आयात करावयाची किंवा स्थानिक)
 • हलकी यंत्रसामुग्री जसे ट्रक्स, टिप्पर्स, पाण्याचे टॅंकर, रोड रोलर, एअर कॉम्प्रेसर, कॉक्रीट मिक्सर इ.
 • प्रत्येकी रु २५०००/- पेक्षा जास्त किंमत असलेली संयंत्र, स्ट्रक्चरल स्टील, MS प्लेट्स, MS राऊंड बार, बिलेट्स.
 • सिमेंट
 • स्फोटके

खरेदी सल्लागार समिती ( क)

खरेदी सल्लागार समिती सदस्य
मुख्य अभियंता ( यांत्रिकी ), जलसंपदा विभाग , अध्यक्ष अध्यक्ष
अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, पुणे सदस्य
अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नागपूर सदस्य
अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नांदेड सदस्य
कार्यकारी अभियंता, यांत्रिकी भांडार विभाग, दापोडी, पुणे सदस्य सचिव
 • खरेदी सल्लागार समिती (क) ने खरेदी करावयाच्या वस्तू / भाग :
 • सर्व प्रकारच्या यंत्रसामुग्रीचे सर्व सुटे भाग
 • ट्रक्स, टिप्पर्स, जीप, कार यांचेकरिता आवश्यक असलेले टायर्स, ट्युब्स, फ्लॅप्स व बॅटरी व अवजड यंत्रसामुग्रीची उपकरणे.

खरेदी सल्लागार समिती ( ई)

खरेदी सल्लागार समिती सदस्य
अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, पुणे अध्यक्ष
अधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, नाशिक सदस्य
अअधीक्षक अभियंता, यांत्रिकी मंडळ, कोल्हापूर सदस्य
अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे सदस्य
कार्यकारी अभियंता, यांत्रिकी भांडार विभाग, दापोडी, पुणे सदस्य सचिव
 • खरेदी सल्लागार समिती (इ) ने खरेदी करावयाच्या वस्तू / भाग :
 • भांडारातील वस्तू जसे पेन्ट्स, जी.आय. पाईप, रिडक्शन गिअर बॉक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटीक ब्रेक्स, वेल्डींग रॉड, पिग आयर्न, कास्ट आयर्न स्क्रॅप, स्टील वायर रोप, बेअरिंग, इलेक्ट्रीक स्टार्टर, इलेक्ट्रीक मोटार, झिंक, इ.
Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.