यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

कार्यप्रकार

यंत्रे, व्दारे भगिरथ यत्नि । सुजलाम सुफलाम भारतभूमी ।।

जलद्वारे व उच्चालक निर्मिती , उभारणी व दुरुस्ती


जलद्वारांच्या माध्यमाने धरणातील पाण्याच्या विसर्गाचे नियंत्रण करण्यात येते . द्वारांचे मुख्य भाग पुढीलप्रमाणे

  • निर्विष्ठ भाग
  • द्वार कळी
  • उच्चालक व्यवस्था

द्वार कळी व निर्विष्ठ भाग यांचे संकल्पन मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना , नाशिक यांचे मार्फत करण्यात येते . जलद्वारांचे कार्य व स्थान यानुसार त्याचे विविध प्रकार पडतात .

जलद्वारे: वक्रद्वारे, झडपद्वारे, बॅरेजची उभी उचलद्वारे, थोपद्वारे, कालवा द्वारे, विद्युत विमोचक द्वारे इ.

उच्चालक : वायर रोप उच्चालक (विद्युत), विद्युत चलित यारी, स्क्रू स्टेम उच्चालक, द्रवचलित उच्चालक, गोलिएथ क्रेन, चेन पुली ब्लॉक इ.

इतर : कचरा प्रतिबंधक संरचना, ट्रान्झिशन व्यवस्था, पातनळ, वाय पीस बल्क हेड, लिफ्टींग बीम, वातनलिका, बायपास इ.

निर्मिती यंत्रणा : यांत्रिकी संघटनेमार्फत द्वारांचे व घटक भागांचे निर्मिती काम प्रामुख्याने दापोडी, पुणे येथील कर्मशाळेत करण्यात येते. याशिवाय खालील ठिकाणी कर्मशाळा आहेत.

  • नागपूर
  • अकोला
  • नांदेड
  • कोल्हापूर
  • सातारा
  • नाशिक

यांत्रिकी संघटनेद्वारे सन 1960 पासून आतापर्यंत जवळजवळ 160974 मे.टन इतकी द्वार निर्मिती कामे करण्यात आलेली आहेत . सन 2006-07 मध्ये 5101 मे.टन एवढी विक्रमी द्वार निर्मितीची कामे करण्यात आली . या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यांत्रिकी संघटनेस महाराष्ट्र शासनाकडून सन 2007 मध्ये रू . 50000 / - चा सांघिक पुरस्कार प्राप्त झालेला आहे .Copyright © 2016 | महाराष्ट्र यांत्रिकी संघटना | All rights reserved.